अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| वित्त विभाग | संपूर्ण जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मंजुर करणारे प्राधिकारी कोण आहेत | संपूर्ण जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मंजुर करणारे प्राधिकारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत. |
2
| वित्त विभाग | वित्तीय नियंत्रणासाठी काय उपाय योजना केली जाते. | वित्तीय सचोटी व संनियंत्रणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती व सर्व उपविभाग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे अंतर्गत लेखापरीक्षण पथकाकडून लेखापरीक्षण करण्यात येते. उपमुख्य व लेखा वित्त अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली खालील प्रमाणे पथकाची रचना करण्यात आलेली आहे.
लेखाधिकारी – पथक प्रमुख
सहाय्यक लेखाधिकारी – १
वरिष्ठ लिपिक – २
कनिष्ठ लिपिक – १
|
3
| वित्त विभाग | वित्त विभागाची कार्यपद्धती कोणत्या नियमानुसार चालते. | महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८, वं ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून प्राप्त झालेले शासन निर्णयानुसार कार्यपद्धती चालते. |
4
| वित्त विभाग | भविष्य निर्वाह निधी शाखे मार्फत कोणकोणती कार्य पार पाडली जातात. | जिल्हा परिषदेकडील शिक्षक वं शिक्षकेतर सेवकांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे. कर्मचार्यांिच्या मागणीनुसार नियमास अनुसरून वैद्यकीय उपचार/ उच्च शिक्षण / लग्न आणि धार्मिक कार्य / घर दुरुस्ती / प्लॉट खरेदी किंवा बांधकाम, अथवा घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अग्रीम मंजुर करणे. अंतिम लेखे वर्ग करणे. मयत कर्मचाऱ्यांचे वारसास ठेव संलग्न विमा योजनेचे लाभ देणे. |