बातम्या

करोना विषाणू संसर्ग - घ्यावयाची काळाजी

-

नागरिकांना मास्क आणि ग्लोव्हज वाटप

आमणापूर, तालुका पलूस येथे पुरपश्चात स्वच्छता करण्यात आली असून नागरिकांना मास्क आणि ग्लोव्हज वाटप करण्यात आले..

ढवळी, तालुका मिरज येथे स्वच्छता मोहीम

ढवळी, तालुका मिरज येथे मिरज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पुरपश्चात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली..

स्वच्छता, कचरा उठाव मोहिम व औषध फवारणी काम युद्धपातळीवर

दुधगाव, तालुका मिरज येथे स्वच्छता, कचरा उठाव मोहिम व औषध फवारणी काम युद्धपातळीवर सुरू आहे..

पुरबाधित आरोग्य उपकेंद्र बुर्ली येथे स्वच्छता मोहीम

पुरबाधित आरोग्य उपकेंद्र बुर्ली, तालुका पलूस येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवली...

पूरग्रस्तांना सहकार्य

पलुस तालुक्यातील चोपडेवाडी येथील पूरग्रस्तांना सहकार्य म्हणून शिरसगाव, तालुका कडेगाव येथील पाच महिला बचत गटातील महिला व गावातील युवक व ग्रामस्थांनीअतिशय जिद्दीने श्रमदान करून गावातील रस्ते, समाज मंदिर, मंदिर व वैयक्तिक घरे स्वच्छ केली.

मिशन नवउर्जा

सांगली जिल्हा परिषदेच्या मिशन नवउर्जा अंतर्गत कवठेमंकाळ येथील संत निरंकारी मंडळ व बाळासाहेब गुरव यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी व विद्यार्थी यांनी कसबे डिग्रज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ ची संपूर्ण स्वच्छता केली..

ग्रामिण भागातील पूरग्रस्त नागरिकांना वैद्यकीय पथकामार्फत अहोरात्र वैद्यकीय सेवा

ग्रामिण भागातील पूरग्रस्त नागरिकांना वैद्यकीय पथकामार्फत अहोरात्र वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे...

पूर पश्चात स्वच्छता मोहीमेचा परिणाम सागाव, तालुका शिराळा..

पूर पश्चात स्वच्छता मोहीमेचा परिणाम सागाव, तालुका शिराळा..

स्वच्छता मोहीम परिणामकारक

दुधोंडी, तालुका पलूस येथे पुरानंतर मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली स्वच्छता मोहीम परिणामकारक ठरत आहे

ग्रामपंचायती मार्फत स्वच्छता मोहीम

शिगाव, ता.वाळवा या पूरग्रस्त गावात ग्रामपंचायती मार्फत स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

पूरग्रस्त गावात संपर्क अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम

पूरग्रस्त गावात संपर्क अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. यामुळे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येण्यास मदत होईल..

ग्रामस्वच्छता स्पर्धेत भटवाडी, पानमळेवाडी प्रथम

-

33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात

33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात. सांगली जि प अंतर्गत 22.94 लक्ष वृक्षांची लागवड व संगोपन केल्या जाणार आहे.

हातातील कामे आवडीने करा तणाव येणार नाही : डॉ. दिलीप पटवर्धन

-

जागतिक योग दिन २०१९

जिल्हा परिषद शाळांमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले

-

यशवंत पंचायत राज अभियान तपासणी समितीची कडेगाव पंचायत समितीला भेट

यशवंत पंचायत राज अभियान तपासणी समितीची कडेगाव पंचायत समितीला भेट यावेळी मा. सभापती व इतर मान्यवर उपस्थित होते

मिरज पंचायत समिती येथे NDRF द्वारा आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

मिरज पंचायत समिती येथे NDRF द्वारा आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यावेळी बचत गटांना टाकाऊ बॉटल्स पासून जीवनरक्षक floats बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले

सांगली जिल्हा परिषद ठरेल रोल मॉडेल

-

टॉयलेट साठी अक्षयकुमार ने केला जि.पं. चा गौरव

सांगली जिल्ह्यात २६ पासून होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’ : अभिजित राऊत

अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे. संतसाहित्यातील स्वच्छतेचा संदेश प्रवचनकार समाजापर्यंत चांगल्याप्रकारे पोहोचवतील. म्हणून २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. जिल्हा परिषदेत जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छतेचा महाजागर’ या अभियानाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, वारकरी साहित्य परिषदेच्या महिला आघाडी प्रमुख मालुश्री पाटील, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब नरुटे, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे आदी उपस्थित होते. अभिजित राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासन (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) व वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ४४ हजार गावांमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ६९९ गावांमध्ये २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. संतसाहित्यातून स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे आणि समाजावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने, शाश्वत स्वच्छतेसाठी प्रवचनकारांचा चांगला उपयोग होईल. मालुश्री पाटील म्हणाल्या, स्वच्छतेचा जागर करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद पूर्ण सहकार्य करेल. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब नरुटे यांनी यावेळी उपस्थित प्रवचनकारांना मार्गदर्शन केले.

सांगली जिल्हा परिषद देशात टॉप 12 मध्ये व राज्यात प्रथम.

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या 12 जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याने 11 वा क्रमांक पटकावला आहे; तर विशेष सहभागाबद्दल पहिल्या 30 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, नांदेड आणि वर्धा या तीन जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त 9 ते 19 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशातील 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 412 जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये सांगली तसेच कोल्हापूर, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांनी यश मिळविले आहे. या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अभिनंदन केले आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या "पंचतारांकित स्वच्छ घर स्पर्धा" आणि "प्लॅस्टिकमुक्त व डासमुक्त गाव स्पर्धा" या उपक्रमाची कार्यशाळा

सांगली जिल्हा परिषदेच्या "पंचतारांकित स्वच्छ घर स्पर्धा" आणि "प्लॅस्टिकमुक्त व डासमुक्त गाव स्पर्धा" या उपक्रमाची कार्यशाळा सांगली येथे घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत गट विकास अधिकारी, निवडक गावांचे सरपंच, ग्रामसेवक, DWSM कक्ष आणि स्वच्छग्रही यांना या उपक्रमाबद्दल प्रशिक्षण देण्यात येत आहे.

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेसाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज.

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेसाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज. 27 नोव्हेंबरपासून 9 महिने ते 15 वर्ष वयोगटासाठी लसीकरण. जिल्ह्यात 6 लाख 92 हजार 335 लाभार्थींची नोंद. 589 टीम, 8 हजार 180 लसीकरण केंद्रे..

मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात कार्यशाळा

सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने ODF+ अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने MHM अर्थात मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.. यात UNICEF, लुल्ला फाऊंडेशन आणि WIT सांगली यांनी सक्रिय सहभाग घेतला..

सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम

-

कुष्टरोग शोधण्यासाठी जिल्ह्यातील ५.३० लाख घरात तपासणी

-

शाळांना अचानक भेटीद्वारे गुणवत्ता तपासणार

-

स्वच्छ भारतासाठी स्वच्छता हीच सेवा मोहिमेत सहभागी व्हा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.

महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे स्वच्छता हीच सेवा मोहिमेच्या लोगो अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सरपंचा स्वप्नाली पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, वाळवा - शिराळा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) दीपाली पाटील, सिनेअभिनेते विलास रकटे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्या सविता पाटील आदि उपस्थित होते.

-

-

-

मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी आज आरग ता मिरज येथे स्वतः ग्रामसेवकांसह प्रधानमंत्री आवास योजनेतील ड यादी नावांचे Awaas+ अँप वर सर्वेक्षण केले

-

*स्वछता ही सेवा* अभियान अंतर्गत 1 वर्ष पूर्ण झाले बद्दल कुमठे, ता. तासगाव येथील श्री शिवराम तातोबा गुरव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिजित राऊत यांनी भेट देऊन शौचालय वापराबाबत माहिती घेतली. यावेळी गतवर्षीचा शौचालय बांधकाम सुरू केलेला फोटो त्यांना भेट दिला..उपस्थितांना SHS बाबत मार्गदर्शन केले....या कार्यक्रमासाठी तासगाव पंचायत समिती सभापती मा. श्रीमती बेबीताई माळी, गटविकास अधिकारी श्री अरुण जाधव,सरपंच श्री महेश पाटील व इतर पदाधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते....