अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| सामान्य प्रशासन | शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व गट ड मधील कार्मच्या-याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते. | सामान्य प्रशासन विभागाकडील शासंन निर्णय क्र.अकंपा -१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाकं २२ ऑगस्ट,२००५ मधील मुद्दा क्रमांक २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट कं व गट ड मधील कार्मच्या-याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते.गट अ,ब(राजपत्रित/अराजपत्रित)या पदावर कार्यरत अधिकारी/ कार्मच्या-याच्या पात्र वारसांदारना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होत नाही.(शासन निर्णय,सामान्य प्रशासन विभाग दिनाकं १७/७/२००७ मधील तरतुदीनुसार गट अ,ब,क,ड मधील शासकीय अधिकारी / कार्मच्या-याच्या नक्षलवादी /आतंकवादी /दरोडेखोर/ समाजविघातक यांच्या हल्यात/कारवाईत मुर्त्यू झाल्यास अशा अधिकारी/ कार्मच्या-याच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्ती लागू ) |
2
| सामान्य प्रशासन | अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेसाठी पात्र नातेवाईक | अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेकरिता ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक –अकंपा-२२८९/३९९६/प्र.क्र.१११२/८९/१२ दिनाक २ मार्च १९९० नुसार पात्र नातेवाईकात प्रथम पत्नी त्यानंतर मुलगे व त्या ही नंतर अविवाहित मुली असा क्रम आहे.
(सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१०१३/प्र.क्र.८/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाक २६ फेब्रुवारी २०१३ नुसार अविवाहित मुलीला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर तिचा विवाह झाल्यास विवाहाच्या दिनाकापासून सहा महिन्याच्या आत तिच्या पतीकडूनही दिवंगत शासकीय कार्मच्या-याच्या कुठुबियाचा तो सांभाळ करील असे हमीपत्र सहा महिन्याच्या आत घेणे आवश्यक )
|
3
| सामान्य प्रशासन | कर्मचारी दिवंगत झाल्यास दिनांकापासून एक वर्षाचे आत मुदतीत अर्ज सदर करणे आवश्यक आहे.
(१) मुर्त्यू दाखला आवश्यक
(२) कर्मचारी ज्या कार्यालयात सेवते असताना मयत झाले त्या कार्यालयाचा दाखला जावक क्रमांक व दिनाकासंह आवश्यक
| अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळनेकारिता सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००१/आठ,मंत्रालय,मुंबई -३२,दिनाक २२ ऑगस्ट ,२००५ मधील मुद्दा क्रमांक २ मधील ३ नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबियाकडून संबधित नियुक्ती प्रधिकार्याकडे अर्ज करण्याची ५ वर्षाची मुदत कमी करून कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनाकापासून एक वर्षाच्या आत मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. |
4
| सामान्य प्रशासन | दिनाक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कार्मचा-याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही
(मयत कार्मचा-याचे कुटुंब मर्यादित असलेचे प्रतिज्ञापत्र आवश्यक )
| सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक अकंपा-१०००/ प्र.क्र.२०/२०००/आठ दिनाक २८ मार्च २००१ नुसार(इ) दिनाक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कार्मचा-याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही . |