जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे 
1 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागवैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान.परिपूर्ण पस्वच्छ भारत अभियानात दारिद्रय रेषेखालील(बीपील) सर्व कुंटूबे व दारिद्रय रेषेवरील (एपील) कुटुंबातील अनुसुचित जातीचे SC कुटुंबे, दारिद्रय रेषेवरील (एपील) कुटुंबातील अनुसुचित जमातीचे ST कुटुंबे , दारिद्रय रेषेवरील लघुसीमांत(अल्पभूधारक) कुटुंबे, दारिद्रय रेषेवरील भूमीहीन मजूर, दारिद्रय रेषेवरील अपंग कुटुंबे, दारिद्रय रेषेवरील महिला प्रमुख असणारी कुटुंबे यांनी वैयक्तिक शौचालय बांधुन वापर सुरु केल्यास रु. 12000/-इतके प्रोत्साहन अनुदान.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागसार्वजनिक शौचालय बांधकाम. तिर्थक्षेत्र बाजारपेठ असलेली गावे,लोकवर्दळीची गावे,ज्या कुंटूबाकडे शौचालय बंाधकामास जागा नाही याकरिता सार्वजनिक ठिकाणी शौचालय युनीट बंधकामांसाठी ग्रामपंचायतीना जास्तीत जास्त रु.३ लाख अनुदान अनुज्ञेय आहे या पैकी ७० टक्के रक्कम स्वच्छ भारत अभियान व ३० टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावरील १५ वित्त आयोग बंधीत निधी मधून अनुज्ञेय आहेत.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
3 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प. 1) सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत घेण्यात येणारी कामे :- सार्वजनिक शोषखडडे, पाझरखडडे, परसबाग, विविध तंत्रज्ञान (DWAT, STP,WSP, इ.) 2) घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घेण्यात येणारी कामे :- सार्वजनिक कंपोस्ट पिट, सार्वजनिक नाडेप, सार्व.कचराकुंडया, ट्रायसिकल, प्लास्टीक पिंजरे इ.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
4 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम - जिल्हा व तालुकास्तरीयपाणी गुणवत्ता कार्यशाळा – राष्ट्रीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी जिल्हास्तरावर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पाणी गुणवत्ता विषयक कार्यशाळा घेण्यात येतात. याद्वारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासनस्तरावरून वेळोवेळी प्राप्त होणा-या सूचना व प्रशिक्षण देण्यात येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
5 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम-जलसुरक्षक प्रशिक्षण कार्यक्रमः- शासन निर्णय क्रमांक.डब्लूक्यूएम-२०१०/प्र.क्र.१९०/पापु-१२/पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय,मुंबई दि.२९ऑगस्ट २०१२ नुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गततालुकापातळीवर व ग्रामपातळीवर प्रशिक्षण राबविले जातात.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर जलसुरक्षक व आरोग्य सेवक यांना मान्सूनपूर्व माहे मार्च व मान्सूनपश्चात माहे सप्टेंबर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यात येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
6 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम-फिल्ड टेस्ट किटसव्दारे पाणी तपासणी फिल्ड टेस्ट किटसव्दारे पाणी तपासणी कार्यक्रम अंतर्गत जिल्हयातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जलसूरक्षक व गावांतील महिलांमार्फत रासायनिक व जैविक पाणी तपासणी मोहीम राबविण्यात येते. याकरिता जलसुरक्षक व गावातील नेमण्यात आलेल्या महिलांचे लॉग इन क्रेडिशनल तयार करण्यात आले आहे. तपासणीच्या नोंदी केंद्रशासनाच्या JJM-WQMIS या संकेतस्थळावर नोंदविल्या जातात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
7 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम-पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण-(शासन निर्णय क्र.डब्ल्यूक्लुएम-२०१०/प्रकं-१९०/पापु-१२/दि.२९-०८-२०१२ पिण्याच्या पाण्याची स्वच्छता सर्वेक्षण मोहीम आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनवेळा आरोग्यसेवक व जलसुरक्षक यांचेमार्फत घेण्यात येते. हि मोहीम पावसाळयापूर्वी माहे एप्रिल व पावसाळ्यानंतर माहे ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येते. त्यामध्ये तीव्र जोखीम आढळून आलेल्या ग्रामपंचायतीना लाल कार्ड (तीव्र जोखीम प्रमाणपत्र)जिल्हास्तरावरून,मध्यम जोखीम आढळून आलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड (मध्यम जोखीम प्रमाणपत्र) तालुकास्तरावरून,व सौम्य जोखीम आढळून आलेल्या ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड (सौम्य जोखीम प्रमाणपत्र) प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत देण्यात येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
8 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम - संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा मुख्य उददेश ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करणे व जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे हा आहे. जिल्हास्तरावर,पंचायत समितीस्तरावर व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून करण्यात येणारी कार्यवाही आधिक परिणामकारक,निर्दोष व नियोजनबध्द व्हावी व जनतेला शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा याकरिता पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,ग्रामपंचायत विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा यांचेमार्फत वेळोवेळी जबाबदारी पाडत आहेत. या कार्यक्रमाचे संपूर्ण सनियंत्रण प्रकल्प संचालक(जजीमि) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद,यांचे नियंत्रणाखालील पाणी गुणवत्ता शाखेमार्फत केले जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
9 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम-पाणी तपासणी कार्यक्रम अंतर्गत रासायनिक व अनुजैविक तपासणी दि.२० जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा (दि १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत ) व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची(Source) व घरगुती नळ कनेक्शनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या (FHTC ) पाण्याची अनुजैविक तपासणीवर्षातून दोनदा (दि. १ जून ते ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर ते ३१ मे या कालावधीत) करण्यासाठी जलसुरक्षकांमार्फतपाण्याचे नमुने गोळा करून घेवून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा केले जातात. हे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठविले जातात. तपासणी पश्चात अहवाल JJM-WQMIS या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम-टीसीएल नमुने (ब्लिचिंग पावडर ) तपासणी कार्यक्रम दर तीन महिन्यातून एकदा व ज्या-ज्या वेळी ग्रामपंचायत टीसीएल (ब्लिचिंग पावडर) ची खरेदी करेल त्यावेळी जलसुरक्षकाने टीसीएलचा नमुना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रयोगशाळेकडून तपासणी करून घेतले जातात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
11 जिल्हा पाणी व स्वच्छता विभागपाणी गुणवत्ता कार्यक्रम-पाणी तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची माहिती जिल्हयातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक, जैविक व टीसीएल (ब्लिचिंग पावडर)चीतपासणीआरोग्य व भुजलविभागाकडील खालील प्रयोगशाळामध्ये करण्यात येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
विभागाने केलेल्या उपक्रम व नाविन्यपूर्ण बाबी

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
पदांचा तपशील
माहिती उपलब्ध नाही
नागरिकांची सनद
माहिती उपलब्ध नाही
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :