अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| महिला व बालकल्याण विभाग | महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यास दौऱ्यामध्ये कोणाचा सहभाग होतो? | ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो. |
2
| महिला व बालकल्याण विभाग | महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन कुठे केले जाते ? | अभ्यास सहलीचे राज्यांतर्गत व राज्याबाहेर आयोजन केले जाते |
3
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण अर्ज कुठे प्राप्त होतात ? | विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकरी यांचेकडे प्राप्त होतात |
4
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण कुठे घेणे आवश्यक आहे | प्रशिक्षण मान्यता प्राप्त संस्थेत घेणे आवश्यक आहे. |
5
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त किती असावा? | प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त १ वर्षाचा असावा. |
6
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे संस्थेला प्रति वर्षी किती रक्कम अनुदानापोटी दिली जाते? | संस्थेला प्रति वर्षी रक्कम रुपये २५,०००/- प्रमाणे अनुदान देण्यात येते. |
7
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे या योजनेचे अर्ज कुठे प्राप्त होतात? | विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्राप्त होतात |
8
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेसाठी लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? | लाभार्थी इ.७वी ते १२ वी पास महिला असावी.सोबत गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक. |
9
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे योजनेतून कोणत्या बाबींवर खर्च केला जातो? | समुपदेशन व सल्लागार यांच्या मानधन व कार्यालयीन सादिल यावर खर्च करण्यात येतो. |
10
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे समुपदेशन केंद्राला कुणाची मान्यता लागते? | समुपदेशन केंद्राला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची मान्यता असणे आवश्यक आहे. |
11
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे समुपदेशन संस्थेकडे कशाची व्यवस्था असणे आवश्यक आहे? | संस्थेकडे स्वतःचे फर्निचर व इतर अनावर्ती खर्चाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. |
12
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेत संगणक प्रशिक्षण कोर्स कुठले दिले जातात? | सदर संगणक प्रशिक्षण कोर्स हा एम.एस.सी.आय.टी.किंवा त्यास समकक्ष असावा |
13
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेचे प्रशिक्षण कुठे घेणे आवश्यक आहे? | प्रशिक्षण मान्यता प्राप्त संस्थेत घेणे आवश्यक आहे. |
14
| महिला व बालकल्याण विभाग | किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायदेविषयक प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कुठल्या स्तरावर दिले जाते? | प्रशिक्षण प्रकल्प स्तरावर दिले जाते |
15
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेचे अर्ज कुठे प्राप्त होतात? | विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्राप्त होतात. |
16
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेचे परिपूर्ण भरलेले अर्ज कुठे दयावेत? | परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत. |
17
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेत प्रस्ताव सादर करण्यासाठी लाभार्थीचे वय किती असावे? | प्रस्ताव सादर करण्यासाठी लाभार्थ्याची वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक |
18
| महिला व बालकल्याण विभाग | महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यास दौऱ्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो ? | पंचायत राज,आदर्श गाव ,निर्मल ग्राम,महिला बळकटीकरण,महिला व विकासचे उपक्रम इत्यादी विषयांची अभ्यास पूर्ण माहिती घेतली जाते |
19
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण परिपूर्ण भरलेले अर्ज कुठे दयावेत ? | परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत |
20
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ? | १)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा.
२)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी /तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा.
|
21
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणशुल्काच्या किती टक्के रक्कम स्वतः लाभार्थीने भरणे बंधनकारक आहे ? | प्रशिक्षण शुल्काच्या १० टक्के रक्कम स्वतः लाभार्थींने भरणे बंधनकारक आहे. |
22
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण लाभार्थींना प्रशिक्षण शुल्काच्या किती रक्कम आदा करणेत येते? | लाभार्थींना प्रशिक्षण शुल्काच्या ९०% रक्कम व जास्तीत जास्त र.रु ५०००/- आदा करणेत येते. |
23
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे? | प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास,ब्युटीपार्लर प्रशिक्षण,केटरिंग,बेकिंग अशा विशिष्ठ प्रकारच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण ,दुग्धजन्य पदार्धाचे उत्पादन, फुड प्रोसेसिंग,शिवणकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण,संगणक दुरुस्ती,मोटार ड्रायव्हिंग,इंग्रजी/मराठी टायपिंग,इमिटेशन ज्वेलरी मेकिंग,लघुलेखन,सेल्स गर्ल,विमा एजंट,परीचारका(नर्स) प्रशिक्षण,इत्यादी.चा समावेश होतो. |
24
| महिला व बालकल्याण विभाग | ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेचे अर्ज कुठे प्राप्त होतात? | विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्राप्त होतात. |
25
| महिला व बालकल्याण विभाग | बालवाडी व अंगणवाडी सेविका,मदतनीस, पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देणे योजनेचे निकष काय आहेत? | प्रमाणपत्र,पुष्प व महिला बालकल्याण समिती मध्ये ठरविण्यात येईल त्या ठोक रक्कमेचा धनादेश. |
26
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे? | कुटुंबातील मारहाण,लैंगिक व इतर तऱ्हेने त्रासलेल्या तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक ,मानसशास्त्रीय,कायदेशीर समुपदेशनासाठी सदर योजना राबविणेत येते. |
27
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेचे परिपूर्ण भरलेले अर्ज कुठे दयावेत? | परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत. |
28
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे या योजनेच्या अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ? | १)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा.
२)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी /तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा.
|
29
| महिला व बालकल्याण विभाग | ७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेत प्रशिक्षण अर्थसहाय्य कसे अदा केले जाते? | प्रशिक्षण अर्थसहाय्य संबंधित संस्थेस अदा केले जाते. तसेच प्रशिक्षणाचे अर्थसहाय्य प्रति लाभार्थी शासन नियमाप्रमाणे अनुदेय राहील |
30
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण देणे योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे? | महिला वा मुलींवर होणारे अन्याय,त्यांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे,यासाठी इयत्ता ४ ते १० वी पर्यंतच्या व महाविद्यालयीन मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे,योगाचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. |
31
| महिला व बालकल्याण विभाग | मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण देणे योजनेत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर किती खर्च केला जातो? | प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर जास्तीत जास्त रु.६००/- पर्यंत खर्च करण्यात येतो. |
32
| महिला व बालकल्याण विभाग | किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायदेविषयक प्रशिक्षण योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे? | किशोरवयीन मुलींना विकास व सक्षमीकरण व्हावे,पोषण वा आरोग्य विषयक दर्जा सुधारावा,त्याचप्रमाणे स्वच्छता,प्रजनन व लैंगिक आरोग्य,विविध कायदेविषयक तरतुदींची माहिती इत्यादीचा समावेश आहे. |
33
| महिला व बालकल्याण विभाग | किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायदेविषयक प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कुणा मार्फत दिले जाते. | प्रशिक्षण विधी तज्ञ,अनुभवी व संवेदनशील तज्ञ मार्गदर्शक यांचेमार्फत दिले जाते. |
34
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेच्या अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ? | १)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा.
२)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी /तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा.
|
35
| महिला व बालकल्याण विभाग | महिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेत लाभार्थीस वस्तूच्या किंमतीच्या किती टक्के रक्कम या कार्यालयाकडे जमा करावी लागेल? | लाभार्थीस वस्तूच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम या कार्यालयाकडे जमा करावी लागेल. |
36
| महिला व बालकल्याण विभाग | ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेचे भरलेले अर्ज कुठे दयावेत? | परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत. |
37
| महिला व बालकल्याण विभाग | ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेच्या अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ? | १)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा.
२)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी |
38
| महिला व बालकल्याण विभाग | ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेचे लाभार्थी निश्चित करणेसाठी निकष कोणते? | लाभार्थी इ.५ ते १० वी पर्यंत शिकणारी मुलगी असावी.
(लाभार्थ्याचे घर ते शाळेमधील अंतराकरिता शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख/मुख्याध्यापक यांचे अर्जावर प्रमाणपत्र नमूद करणेत यावे.)
|
39
| महिला व बालकल्याण विभाग | विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार करणे योजनेचे लाभार्थी निश्चित करणेसाठी निकष कोणते? | १.लाभार्थी सांगली जिल्यातील रहवासी असावा. २.लाभार्थीने चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य स्तर किंवा त्यापेक्षा उच्च स्तरावर क्रीडा,कला शिक्षण,अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले असावे. व त्याबाबतच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत प्रस्तावासोबत सादर करावी. |
40
| महिला व बालकल्याण विभाग | विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार करणे योजनेत बालवाडी व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस,पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. | प्रमाणपत्र ,पुष्प व महिला बालकल्याण समिती मध्ये ठरविण्यात येईल त्या ठोक रक्कमेचा धनादेश. |