जिल्हा परिषद सांगली
Zilla Parishad Sangli

प्राथमिक शिक्षण

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे 
1 प्राथमिक शिक्षण योजनाशालेय पोषण आहार0शालेय पोषण आहार योजना ही महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र.पूप्राशा/1095/2134/प्राशि-2, दिनांक 22/11/1995 अन्वये इयत्ता 1 ते 5 साठी सुरु केली आहे. तसेच पुढे शासन निर्णय क्रमांक शापोआ-2008/(प्र.क्र./264)/प्राशि-4,दि.08/08/2008 अन्वये ती इ. 6 वी ते 8 वी साठी लागू करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 08 जून 2009 अन्वये शालेय पोषण आहार योजनेची नवीन सुधारीत कार्यपध्दती दि. 1जुलै 2010 पासून अमंलबजावणी सुरु झालेली आहे. सुधारीत अमंलबजावणीनुसार शासनाने नियुक्त केलेल्या पुरवठाधारका मार्फत थेट शाळास्तरावर तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा करणेंत येतो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 प्राथमिक शिक्षण योजनासमग्र शिक्षा (सर्व शिक्षा अभियान)0समग्र शिक्षा उपक्रमाच्या यशस्वी व वस्तूनिष्ठ अंमलबजावणीसाठी दरवर्षी वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक (AWP&B) तयार करुन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयास सादर केला जातो व शासनाच्या मंजूरीनुसार त्या वर्षात उपक्रम राबविले जातात. वार्षिक कार्ययोजना अंदाजपत्रक (AWP&B):- गाव आराखडा, समूह साधन केंद्र आराखडा, गट आराखडा यांच्या आधारे जिल्हयाची वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाची निर्मिती केली जाते. समग्र शिक्षा स्वरुप :- समग्र शिक्षा ,अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात ते खालील प्रमाणे- शाळाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण , मोफत पाठ्यपुस्तके योजना, मोफत गणवेश योजना, गट साधन केंद्र अनुदान (BRC) समूह साधन केंद्र अनुदान (CRC), सयुंक्त शाळा अनुदान, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, नवोपक्रम अनुदान, शाळा व्यवस्थापन समिती, राष्ट्रीय अविष्कार अभियान, पी एम श्री शाळा, निपुण भारत, व्यवसाय शिक्षण, बांधकाम.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
3 प्राथमिक शिक्षण योजनादुर्बल घटकातील व अ.जा./अ.ज.च्या मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता0अनुसुचित जााती उपयोजना जिल्‍हा वार्षिक योजना निधी अर्थसंकल्पित करणेबाबत सुधारित कार्यपध्‍दतीविषयीचे महा. शा. सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय क्रमांक -विघयो-२०१०/प्र.क्र.२६/विघयो, दिनांक-१३ एप्रिल, २०१७ अन्‍वये इयत्ता-१ ली ते ४ थी मध्ये शिकणा-या अनुसूचित जाती /जमाती/भटक्या जमाती मधील दारिद्रय रेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता अदा करणेत येतो. मुलींच्या ७५ टक्के उपस्थितीच्या आधारे प्रतिदिन र.रु.१/- या प्रमाणे वर्षात जास्तीत जास्त र.रु. २२०/- प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. सदर पात्र लाभार्थी मुलींची निवड निकषाप्रमाणे संबंधित गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेकडून करण्यात येते. निवड केलेल्या पात्र मुलींच्या संख्येप्रमाणे जिल्हास्तरावरुन गट शिक्षणाधिकारी यांना अनुदान वितरीत करण्यात येते. सदरचा खर्च तालुकास्तरावरुन करण्यात येतो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
4 प्राथमिक शिक्षण योजनाप्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला अनुदान0जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती करणेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करणेत येते. या अनुदानामधून शाळा दुरुस्तीची कामे मंजूर केली जातात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
5 प्राथमिक शिक्षण योजनाप्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला अनुदान0जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करणेत येते. या अनुदानामधून नवीन शाळा इमारत बांधकामाची कामे मंजूर केली जातात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
6 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद सेस प्रा. शाळा विशेष दुरुस्ती/कंपाऊंड वॉल योजना0जिल्हा परिषद सेस अनुदानातुन बांधकामासाठी अनुदान मंजूर करणेत येते. सदर अनुदानातुन शाळा / वर्गखोली दुरुस्ती, शाळांना कंपाऊंड वॉल बांधणे ही कामे मंजूर केली जातात. निधी उपलब्धतेनुसार दरवर्षी कामे घेतली जातात. प्रा.शाळा विशेष दुरुस्तीसाठी विविधस्तरावरुन जी निवेदने प्राप्त होतात, सदर निवेदनामधूल उपलब्ध असलेल्या अनुदाना अनुसरुन व प्राप्त अंदाजपत्रके घेवून कामे घेणेत येतात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
7 प्राथमिक शिक्षण योजनामुलींची उत्कृष्ट पट नोंदणी करणाऱ्या प्राथमिक शिक्षक / विस्तार अधिकारी यांना पारितोषिके देणे0शासन निर्णय क्र.ओडियो 2883/(दोन)/अर्थसं-1 महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवायोजन विभाग दि.10 डिसेंबर 1984 नुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाते. जिल्हयातील 100 टक्के मुलींना शाळेत दाखल करणे व त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणे याकरिता शिक्षकांनी प्रयत्न करावेत हा या योजनेचा उद्देश आहे. शाळेच्या कार्यक्षेत्रातील 100 टक्के मुलींना शाळेत दाखल करणे व त्यांची उपस्थिती 100 टक्के होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षक व विस्तार अधिकारी यांना या योजनेतंर्गत प्रत्येकी ‎ . 100/- प्रमाणे पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात येते. सदर योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट पटनोंदणीसाठीचे प्रस्ताव मागविण्यात येतात. प्राप्त प्रस्तावातून ज्या शाळांमध्ये जास्तीत जास्त मुली दाखल झाल्या आहेत अशा प्रथम 27 शिक्षकांची व 1 विस्तार अधिकारी यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या प्रस्तावांस मा.शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांची मंजूरी घेतली जाते. सदर योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रक्कम ‎ .4,000/- (चार हजार मात्र) तरतूद मंजूर आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
8 प्राथमिक शिक्षण योजनाकब-बुलबुल योजना0योजनेचे स्वरुप:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक एससीजी 2004/(158/2004)/माशि-7 मंत्रालय विस्तार भवन,मुंबई दिनांक 5 फेब्रुवारी 2005 व शासन निर्णय,शालेय शिक्षण विभाग क्र.पीआरई 1097/1526/प्राशि-1 दिनांक 19 मार्च 1998 अन्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमधून कब-बुलबुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असून मुलांना कब/बुलबुल असे म्हटले जाते.ही योजना 1ते 4 थी पर्यंत राबविली जाते.मुलांच्या युनीटना कब पथक व मुलींच्या युनीटला बुलबुल असे म्हणतात.कब पथक मार्गदर्शक शिक्षकांना कब मास्टर असे म्हणतात.बुलबुल युनिट मार्गदर्शक शिक्षिकेला फ्लॉक लिडर असे म्हणतात.एका पथकामध्ये किमान 20 मुले किंवा मुली असणे आवश्यक आहे. योजनेचा उद्देश :- कब/बुलबुल युनिट मध्ये त्यांच्या कब मास्टर व फ्लॉक लिडर मार्फत त्यांच्या वयोगटानुसार आदर्श नागरिक घडविण्यासाठी नैतिक,शारिरिक शिक्षण देवून त्यांचा मानसिक विकास घडविला जातो.हे प्रशिक्षण खेळ,गाणी,काही प्रकल्प,प्रात्यक्षिके या आधारे दिले जाते.सन 1994-1995 पासून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळेतील समान कार्यक्रमांतर्गत व कार्यानुभव विषयांतर्गत हया अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केला आहे. सदर योजनेकरीता जि.प.सेस मधून सन 2014-2015 करीता ‎.2,00,000/- तरतूद मंजूर आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
9 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक विजेत्यांना क्रीडा शिष्यवृत्ती देणे0यामध्ये जिल्हास्तरावर घेणेत आलेल्या स्पर्धा मधील वैयक्तीक खेळामध्ये प्रथम,द्वित्तीय क्रमांक विजेत्याना दर महा एका विद्यार्थ्याना 75 रुपये प्रमाणे 10 महिनेसाठी 750/- प्रमाणे एकूण 27000/- हजार मात्र विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती स्वरूपात दिली जाते स्वरूप :- खेळामध्ये आवड निर्माण करणे, संघ भावना निर्माण करणे, विद्यार्थीसाठी आर्थिक मदत देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्ती विकासाना संधी करून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगी क्रीडा कैाशल्याची उपासना करणे,जिल्हयातील विद्यार्थ्यांमधून उच्च प्रतींचे खेळाडू निर्माण करणे. इत्यादी
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 प्राथमिक शिक्षण योजनाशिष्यवृत्ती सराव परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गौरव0मा.आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दरवर्षी पूर्व माध्यमिक/माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात.जिल्हा परिषदेच्या शाळांतून या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.यासाठी उत्तीर्णंचे प्रमाण व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरुन मार्गदर्शन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येते. तसेच पूर्व माध्यमिक/माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा दर्जा व गुणात्मक वाढ होऊन आत्मविश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह,प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येते. सदर योजनेकरीता जि.प. सेस मधून ¸‎.2,50,000/- तरतूद मंजूर आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
11 प्राथमिक शिक्षण योजनाशिष्यवृत्ती परीक्षेस मार्गदर्शन करणाऱ्या शाळा व शिक्षकाना पारितोषिके0शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परीक्षेपैकी शिष्यवृत्ती परीक्षा ही महत्वाची आहे.या स्पर्धा परीक्षेत आपला विद्यार्थी चमकावा यासाठी अनेक पालक ,शिक्षक अतोनात प्रयत्न करीत असतात.शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा स्त्रोत प्रामुख्याने प्राथमिक शाळांमध्ये होत असतो.जि.प.शाळांतून या परीक्षांना बसणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शाळा स्तरावर मिळावे या करीता शिक्षकांना मार्गदर्शनाच्या कामात प्रोत्साहन मिळावे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून सदर योजना जिल्हा परीषदेमार्फत राबविणेत येते. निकष:-1)इ.4थी पटाच्या 100 टक्के विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून निकाल जास्तीत जास्त लावणे.व गुणवत्ता यादीत विद्यार्थी येणे. 2)इ.7वी पटाच्या जास्तीत जास्त विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून निकाल जास्तीत लावणे व गुणवत्ता यादीत विद्यार्थी येणे.सदर योजनेकरीता जि.प.सेस मधून 20,000/- तरतूद मंजूर आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
12 प्राथमिक शिक्षण योजना४% शासन सादील अनुदान0 मा. शिक्षण उपसंचालक , प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे -1 यांचेकडून जिल्हा परिषदांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांसाठी 4% सादील रक्कम दरवर्षी प्राप्त होते. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. उमाशा-2020/ प्र क्र.13 /एसएम-4, दिनांक 4 जून 2020 नुसार योजना राबविणेची असून नमूद शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार 80 % र.रू. तालुकास्तरावर वितरीत करणेत येते तर उर्वरीत 20% रक्कम मुख्यालय स्तरावर उपरोक्त शासन निर्णयातील नमूद बाबींवर खर्च करणेकरीता राखून ठेवली जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
13 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद प्रा. शाळा विनामोबदला बक्षिसपत्र0जिल्हा परिषद प्रा.शाळा विनामोबदला बक्षीसपत्रासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा परिषद सेस मधून करणेत येते. ज्या प्रा.शाळांचे बक्षीसपत्र झालेले आहे, अशा प्रा.शाळांचे रजिस्ट्रेशन व मुद्रांक शुल्कसाठी येणारे खर्चाची प्रतिपूर्ती जि.प.सेस मधून तरतूद करुन खर्च करणेत येतो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद प्रा. शाळा जागा मोजणीसाठी अनुदान0जिल्हा परिषद प्रा.शाळांचे जागा मोजणी फी साठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जि.प.सेसमधून करणेत येते. प्रा.शाळांचे जागांची हदद निश्चित करणेसाठी मोजणी करुन घेणेत येते. सदरची मोजणी फीचे झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करणेत येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
15 प्राथमिक शिक्षण योजनाशैक्षणिकदृष्टया मागासलेल्या भागातील प्राथमिक शाळेतीलअनु.जाती/ जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती प्राथमिक शाळेतील अनुसुचित जाती/जमाती,भटक्या जमाती, व विमुक्त जातीच्या मुलांची इतर मुलांपेक्षा पटसंख्या फार कमी आणि असमाधानकारपणे असते. व या जमातीचे मुलांकडे तुलनात्मकरित्या पहाता इतर मुलांपेक्षा शाळेतील उपस्थिती फारच कमी असल्याने त्याचा परिणाम प्राथमिक शिक्षणाच्या पटनोंदणीवर होतो. परिणामी पटनोंदणी कमी होते. म्हणून प्राथमिक शाळेतील वरिल जाती/जमातीच्या मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी वरिल योजना कार्यान्वीत करणेत आलेली आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
16 प्राथमिक शिक्षण योजनाग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देणे या योजनेमध्ये ग्रामिण भागातील जि.प.च्या प्राथमिक शाळा म्हणजे, इ.1 ली ते 4 थी च्या 09 शाळा व उच्च प्राथमिक म्हणजे इ.5 वी ते 7 वी च्या 09 शाळा आशा एकूण 18 शाळांची निवड समितीमध्ये निवडल्या जातात. इ.1 ली ते 4 थी च्या शाळा रक्कम रूपये 500/- व इ.5 वी ते 7 वी च्या शाळांना रोख रक्कम रूपये, 1000/- व सन्मान चिन्हा, प्रमाण पत्र, देवून गौरव केला जातो. स्परूप :- रोख रक्कम व प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देवून गौरव करणे,परिसरातील इतर शाळांना प्रेरित करणे, ग्रामस्थांना आपल्या गावातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड व्हावी म्हणून शाळागृह सुधारणेसाठी प्रवृत्त करणे, शिक्षकांच्या मानात ईर्षा निर्माण करणे , व विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक भावना तयार करणे, निकष :- उपस्थिती टिकविणे, पटनोंदणी लक्ष्य 100 टक्के साध्य करणे, स्पर्धात्मक परीक्षांना विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, शैक्षणिक कामात ग्रामस्थांचा सहभाग मिळविणे, शैक्षणिक योजना यशस्वीपणे राबविणे इत्यादी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
17 प्राथमिक शिक्षण योजनासावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना0शिक्षणाचा मोठया प्रमाणावर प्रसार व्हावा म्हणून शासनाने वेळोवेळी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. असे असून देखील अनेक मुली व स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांची हलाखीची आर्थिक स्थिती. ही स्थिती लक्षात घेता मुलींच्या शिक्षणाला चालाना देण्याचा दृष्टीने व मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सहाय्यभूत होईल अशी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शासनाने सन 1983-84 मध्ये सुरु केली. शिक्षणाचा मोठया प्रमाणावर प्रसार व्हावा म्हणून शासनाने वेळोवेळी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. असे असून देखील अनेक मुली व स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांची हलाखीची आर्थिक स्थिती. ही स्थिती लक्षात घेता मुलींच्या शिक्षणाला चालाना देण्याचा दृष्टीने व मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सहाय्यभूत होईल अशी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शासनाने सन 1983-84 मध्ये सुरु केली. लाभार्थी मुलींच्या निवडीचे निकष : ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक दृष्टया मागासलेल्या मुलींना आणि शहर तसेच उपनगरीय झोपडपट्टयांमधील गरजू मुली. 1) अनुसूचित जाती/जमाती , भटक्या आणि विमुक्त जातीतील मुलींना प्राधान्य देण्यात येते. 2) इयत्ता 1 ली ते 8 वी इयत्तेत शिकणा-या मुली या योजनेत आर्थिक मदत मिळण्यास पात्र राहतील. 3) दत्तक पालकांकडून दत्तक मुलीस तीचे इयत्ता 8 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा रु.30/- आर्थिक मदत देण्यात येते. निधी संकला पध्दती : 1) योजना सुरु होताना पहिली 2 वर्षे 100 रु. व 50 रु ची पावती पुस्तक छपाई करुन निधी संकलित केला. 2) त्यानंतर 10 रु. ची पावती पुस्तके तयार करुन शिक्षकांमार्फत निधी संकलित करणेत आला. 3) पुढे nab च्या अंधानिधी प्रमाणे card तयार करुना विद्यार्थ्यांच्या मार्फत निधी जमा करण्यात आला. 4) त्यानंतर आतापर्यंत समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत रु.3000/- किंवा त्या पटीत देणगी स्विकारुन सदरची देणगी यासाठी स्थापन झालेल्या व्यवस्थापन समितीच्या नावे मुदतबंद ठेवी(एफ.डी) केली जातो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
18 प्राथमिक शिक्षण योजनाप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम0समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे आवश्यक असून, देशातील बहुतांशी समाज ग्रामीण भागात राहत असल्याने देश व राज्य यांच्या विकासासाठी शहरी भागातील शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभाग, दि.7 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयान्वये गुणवत्ता विकास कार्यक्रमानुसार शाळांचे मूल्यांकन करताना शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता इ.बाबी लक्षात घेवून 200 गुणांपैकी मूल्यांकन केले जाते. सन 2014-15 मध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंतर्गत सर्व तालुक्यांना त्यांच्या गटातील शाळांचे मूल्यांकन करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रथमत: केंद्रप्रमुख व विस्तार अधिकरी यांचेमार्फत सर्व शाळांकडून स्वयंमूल्यमापन प्रपत्र घेण्यात येईल. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार तालुकास्तरावर समितीची स्थापन करण्यात येईल. या समितीमार्फत दि.01 जानेवारी 2015 ते 20 जानेवारी 2015 या कालावधीत शाळांचे मूल्यांकन करण्यात येईल. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून 3 याप्रमाणे एकूण 27 शाळांची निवड करुन त्यांचे मूल्यांकन जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येईल व त्यातून जिल्हास्तरावर प्रथम तीन शाळांची निवड करुन त्यांचा गुणगौरव करण्यात येईल. • योजनेचे नांव - NAS आधारित सराव चाचणी हा उपक्रम राबविणे. • कालावधी - सन 2022-23 ते सन 2024-25 • उद्देश - 1) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे. 2) भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या चाचण्यांचा सराव करणे. 3) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे. • कार्यवाही - ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील इ.1 ली ते इ.8 वी च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणेसाठी NAS (National Achievement Suvey) - राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेण्यास दिनांक 06 जुलै 2022 रोजीच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार मान्यता घेण्यात आली. त्यानुसार शाळास्तरावर प्रत्येक महिन्याला 1 सराव चाचणी तसेच जिल्हास्तरावर दर तीन महिन्याला 1 या प्रमाणे चाचण्यांचे नियोजन केले जाते. त्यानुसार - 1) सन 2022-23 मध्ये NAS आधारित सराव चाचणी क्र.1 ते 3 चे आयोजन करण्यात आलेले होते. 2) सन 2023-24 मध्ये NAS आधारित सराव चाचणी क्र.1 ते 3 चे आयोजन करण्यात आलेले होते. 3) सन 2024-25 मध्ये NAS आधारित सराव चाचणी क्र.1 माहे जानेवारी मध्ये संपन्न झाली. माहे मार्च 2025 मध्ये NAS आधारित सराव चाचणी क्र.2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. • फलनिष्पत्ती - विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणेस मदत झाली.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार योजना0समाजाची निस्वार्थी भावनेने ,निष्ठेने शैक्षणिक तसेच सामाजिक सेवा करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना अंगिकृत कामात त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक पुरस्कार दिला जातो. सांगली जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून १ शिक्षक अशा एकूण १० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. पंचायत समिती स्तरावरुन आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व सभापती यांच्या शिफारशीने प्राप्त होतात. त्यानंतर जिल्हा स्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून १ याप्रमाणे अशा १० प्राथमिक शिक्षकांची निवड केली जाते. तसेच सदरच्या निवडीला मा. आयुक्त यांची कार्योत्तर मंजूरी घेतली जाते. शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी केले जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
20 प्राथमिक शिक्षण योजनाराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान केंद्र शासनच्या 11 व्या व 12व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरु करण्यात आले असून सन-2017 पर्यंत माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकिकरण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.सन-2017 पर्यंत एकात्मीक पध्दतीनी राज्याच्या भागीदारीने हा कार्यक्रम अमलात आणावयाचा आहे.माध्यमिक शाळेमध्ये जाणा-या सर्व मुला-मुलींना 2017 पर्यंत जीवनावश्यक व गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याची ग्वाही राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना अंतर्गत देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये राबवले जाणारे उपक्रम 1) शाळा अनुदान 2)स्वसंरक्षण प्रशिक्षण 3) ग्रंथ महोत्सव 4) वेध भविष्याचा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
21 प्राथमिक शिक्षण योजनाआदर्श शाळामंध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे१ वर्ष१) मध्यान्ह भोजनाकरीता स्वयंपाकगृह व भांडारकक्ष तसेच परसबाग विकसीत करणे. २) विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढवणेकरीता शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देणे. ३) जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये विद्युतीकरण करणे (अनावर्ती खर्च). ४) आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करणे (उदा. Fire Extinguisher, etc). ५) प्रथमोपचार पेटी. ६) शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम/स्पर्धा आयोजित करणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद शालेय विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धा0 जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थीमध्ये खेळांविषयी आवड निर्माण होऊन त्यांचे सुप्त कलागुणांना वाव मिळणेकामी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली मार्फत जि. प. स्वीय निधी अंर्तगत जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांकरिता क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. सदर स्पर्धेकरिता जिल्हा परिषद, सांगलीच्या अर्थ संकल्पामध्ये दरवर्षी तरतुद करणेत येते. तालुकास्तर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेणेत आलेल्या स्पर्धांचे अंतिम निकाल या कार्यालयात मागणी करणेत येतात व जिल्हास्तरील विविध क्रीडा स्पर्धा घेणेचे आयोजन केले जाते. वर्षातील अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली रकमेच्या ५०% रक्कम तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यास तालुक्यातील केंद्र संख्येनुसार एकूण वितरीत करण्यात येते व उर्वरीत रक्कम जिल्हास्तरावर खर्च करण्यात येतो. सदर योजना राबविणेस शिक्षण समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
23 प्राथमिक शिक्षण योजनापद्म.वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार0 प्रतिवर्षी सांगली जिल्हा परिषदेमार्फत जिल्हयात कै. पद्मभूषण वसंतरावदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना राबविली जाते. सदर योजनेस जिल्हा स्विय निधी मधून र.रु. 4,00,000/- खर्च करणेस अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये मान्यता दिली जाते. सांगली जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील नामवंत व सर्वोत्कृष्ठ क्रीडापटू, क्रीडाशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक / संघटक यांचेसाठी कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जाणार आहे. सदर योजना कायस्वरूपी असुन दरवर्षी ही योजना सांगली जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित केली जात आहे. सांगली जिल्हयातील ग्रामीण भागात क्रीडा व खेळ यांचा विकास करणे, खेळाडुमध्ये निकोप स्पर्धात्मक प्रवृत्ती वाढीस लावणे, तरूण वर्गातील अपप्रवृत्तींना प्रतिबंध करणे ही उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेऊन हा जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत क्रीडा खेळाडू , क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांना पद्मभूषण वसंतरावदादा पाटील यांच्या जन्मदिनी पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
24 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद शालेय विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धा0 जिल्हा परिषद , शाळांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अंगभृत कलांना वाव देणेसाठी तसेच त्यांना एक व्यासपिठ मिळणेसाठी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली मार्फत तालुकास्तर व जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते . या करिता जिल्हा परिषद सांगलीच्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात लेखाशीर्ष २२०२-१०१--२७ या कार्यक्रमास सन २०२३-२४ र.रु.३,००,०००/-इतका निधीची तरतूद जि.प.स्वीय निधीमधून केली जाते. उपलब्ध तरतुदीमधून तालुकास्तरावर १,५०,०००/- इतका निधी वितरीत करण्यात येतो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
25 प्राथमिक शिक्षण योजनाशैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा0सांगली जिल्हा परिषदे मार्फत प्रतिवर्षी जिल्हा परिषद स्विय निधीमधून " शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा सन पुरस्कार देणे ही योजना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांचेसाठी राबविणेत येते. सदर योजने करिता जिल्हा परिषद, सांगलीच्या जि प स्वीय निधीमध्ये दरवर्षी तरतूद करणेत येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
26 प्राथमिक शिक्षण योजनाविज्ञान प्रयोगशाळा (Science Lab), संगणक प्रयोगशाळा (Computer Lab)/डिजीटल शाळा, इंटरनेट/वाय-फाय सुविधा निर्माण करणे.१ वर्ष१) विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित या विषयांची आवड निर्माण व्हावी व त्यांचा चौकसपणा व सृर्जनशील कलागुणांना वाव मिळावा तसेच, ज्या मुलांचा गणित व विज्ञान विषयांमध्ये विशेष कल व प्रतिभा आहे, त्यांना आणखी प्रोत्साहन देऊन, त्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राची / प्रयोगशाळेची निर्मिती करणे व असलेल्या विज्ञान केंद्राची / प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करणे २) शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा / ICT Lab निर्माण करणे व त्याची देखभाल करणे (अनावर्ती खर्च). ३) आवश्यकतेनुसार वर्ग खोलीकरीता ई-लर्निंग प्रोजेक्ट स्थापित करणे, अभ्यास क्रमात्तील संकल्पना वृद्धीगत करण्याकरीता अभ्यासक्रमातील संकल्पना आधारित संगणकीय प्रणाली (Software) उपलब्ध करुन देणे. ४) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा बसवणे. ५) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घेणेकरीता डिजिटल उपस्थिती (Attendance) यंत्रणा कार्यान्वित करणे. ६) जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंटरनेट/ वायफाय सुविधा उपलब्ध करुन देणे (अनावर्ती खर्च). ७) जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शैक्षणिक चॅनल सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे. (उदा. टी.व्ही/स्क्रीन इ.)
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
27 प्राथमिक शिक्षण योजनाबाल भवन विज्ञान केंद्र दुरुस्ती योजना0 प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली अधिनस्त १)जिल्हा परिषद, शाळा, आटपाडी नं. 1, ता.आटपाडी,२) जिल्हा परिषद, शाळा, देवराष्ट्रे, कडेगाव,३) जिल्हा परिषद, शाळा, जत नं.1,ता.जत४) जिल्हा परिषद, शाळा, इस्लामपूर नं. 2, ता.वाळवा५) जिल्हा परिषद, शाळा, पलूस नं. 1,ता.पलूस६) जिल्हा परिषद, शाळा, वासुंबे ,ता.तासगाव ७) जिल्हा परिषद, शाळा, आरवडे,ता.तासगाव८) जिल्हा परिषद, शाळा, कवलापूर नं.2,ता.मिरज ९) जिल्हा परिषद, शाळा, शिराळा नं.1,ता.मिरज १०) जिल्हा परिषद, शाळा, नागेवाडी,ता. खानापूर यथे बालभवन विज्ञान केंद्र स्थापन करणेत आली आहेत. सदर बालभवन विज्ञान केंद्रातील साहित्याची देखभाल व दुरूस्ती करिता प्रत्येक वर्षी अनुदान प्राप्त होते. तसेच सदर अनुदान तालुकास्तरावर वितरीत करणेत येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
28 प्राथमिक शिक्षण योजनाआमदार स्थानिक विकास कार्यक्रम0१ राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासन अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रम शाळा व महाविद्यालये यांना ग्रंथालयांसाठी पुस्तके खरेदी करण्याकरीता प्रती संस्था १२.०० लक्ष च्या रकमेच्या मर्यादेत निधी मंजूर करता येईल. २ शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शांळा, आश्रम शाळा (प्राथमिक, माध्यमिक) या शाळांच्या वर्ग खोल्या, संगणक खोल्या, स्वच्छता गृहे, संरक्षण भिंत, खुले रंगमंच बांधणे इ. कामे ₹१५.०० लक्ष च्या मर्यादेत अनुज्ञेय राहील. ३ शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांच्या प्रभावी वापरासाठी, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, शासन अनुदानीत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, आश्रम शाळा, अनुदानीत शिक्षण संस्थांकरीता (प्राथमिक, माध्यमिक, तंत्र शिक्षण संस्था तसेच अंगणवाडी साठी संगणक व अनुषंगीक उपकरणे, शैक्षणिक आज्ञावल्या खरेदी करणे, इलेक्ट्रॉनिक अध्यापन साहित्य) दृक श्राव्य सुविधा पुरविणारे उपकरण पुरविणे अनुज्ञेय राहील. याबाबत शालेय शिक्षण विभागाने धोरण ठरवून त्यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक आज्ञावल्या विहीत करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाच्या व माहिती तंत्रज्ञान विभागांनी शिफारस केल्यानुसार शैक्षणिक आज्ञावल्या, ई-लर्निंग इ. साहित्याची खरेदी करणे अनुज्ञेय राहील. एका संस्थेसाठी एका वर्षात जास्तीत जास्त २५ लक्ष च्या मर्यादेत कामे विधीमंडळ सदस्य प्रस्तावित करु शकतील.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील सन २०२४-२५ मध्ये अभिलेखे जतन व दाखल्याचे संगणकीकरण योजना0 जिल्हा परिषद स्वियनिधी प्रथम सुधारित तरतूद सन २०२४- २५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे अभिलेखे दाखल्याचे संगणकीकरण या योजनेकरिता १५,००,०००/-(अक्षरी र.रु. पंधरा लाख) इतकी तरतूद करणेत आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जनरल रजिस्टरमधील माहितीवरून मिळणारा शाळा सोडलेचा दाखल्याचा उपयोग वयाचा पुरावा, जातीचा दाखला, जातपडताळणी, वारसा रजिस्टर तसेच इतर शासकीय कामी पुरावा म्हणून वापर करता येतो. सदर रजिस्टर शाळा स्थापनेपासून असलेने ते जीर्ण होत असल्याने त्याचा भविष्यात वापर करणेकरिता जनरल रजिस्टर मधील सर्व ए३, ए४ पानांचे स्क्यानिंग करून वर्षनिहाय पीडीएफ फाईल तयार करून त्यामध्ये स्क्यानिंग केलेली सर्व पृष्ठ अपलोड करणे व अपलोड केलेली पृष्ठ शिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना पासवर्ड देऊन नागरिकांच्यामागणीनुसार ते ओपन करून दाखला देणे असे स्वरूप आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
30 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद स्वियनिधी प्रथम सुधारित तरतूद सन २०२४- २५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे अभिलेखे दाखल्याचे संगणकीकरण0 जिल्हा परिषद स्वियनिधी प्रथम सुधारित तरतूद सन २०२४- २५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे अभिलेखे दाखल्याचे संगणकीकरण या योजनेकरिता १५,००,०००/-(अक्षरी र.रु. पंधरा लाख) इतकी तरतूद करणेत आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जनरल रजिस्टरमधील माहितीवरून मिळणारा शाळा सोडलेचा दाखल्याचा उपयोग वयाचा पुरावा, जातीचा दाखला, जातपडताळणी, वारसा रजिस्टर तसेच इतर शासकीय कामी पुरावा म्हणून वापर करता येतो. सदर रजिस्टर शाळा स्थापनेपासून असलेने ते जीर्ण होत असल्याने त्याचा भविष्यात वापर करणेकरिता जनरल रजिस्टर मधील सर्व ए३, ए४ पानांचे स्क्यानिंग करून वर्षनिहाय पीडीएफ फाईल तयार करून त्यामध्ये स्क्यानिंग केलेली सर्व पृष्ठ अपलोड करणे व अपलोड केलेली पृष्ठ शिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना पासवर्ड देऊन नागरिकांच्यामागणीनुसार ते ओपन करून दाखला देणे असे स्वरूप आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 प्राथमिक शिक्षण योजनाजिल्हा परिषद स्वीय निधी०१ वर्ष१) जिल्हा परिषद मधील इयत्ता-पहिली, दुसरी, तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता चाचणी घेतली जाते. २) जिल्हा परिषदेकडे इयत्ता-चौथी व इयत्ता सातवी करिता डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी ही परीक्षा घेतली जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
32 प्राथमिक शिक्षण योजनासुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना0इ.१ ली ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच इतर किरकोळ खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे दर खालीलप्रमाणे राहतील :- इयत्तानिहाय शिष्यवृत्तीचा वार्षिक दर प्रति विद्यार्थी / प्रति विद्यार्थिनी - इ. १ ली ते ४ थी र.रु.१०००/- व इ. ५ वी ते ७ वी र.रु.१५००/- आणि इ.८ वी ते १० वी र.रु.२०००/- सदर योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे राहतील :- (१) शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. (२) नामांकित मध्ये सैनिकी शाळांमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्यामध्ये शासनाकडून त्याच्या शिक्षणाचा खर्च अवा करण्यात येतो अशा अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. (३) ज्या विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय (केंद्र व राज्य शासन) व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (केंद्र व राज्याच्या) तसेच शासन अनुदानीत संस्थांमध्ये सेया करीत आहेत, तसेच ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न र.रु.१.०८ लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांना उपरोक्त शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहणार नाही. (४) अनूसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रतिमाह ८०% असणे आवश्यक राहील. (५) गावास आलेल्या विद्यार्थ्‍यांना त्याच इयत्तेमध्ये दुस-यांदा सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. परंतु, सदर अनुत्‍तीर्ण विद्यार्थी उत्‍तीर्ण होऊन त्यांनी वरच्या इयत्तेत प्रवेश मिळविल्यास त्यांना त्या इयत्तेमध्ये सदर योजनाचा लाभ अनुज्ञेय राहील.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 प्राथमिक शिक्षण योजनाकृतीयुक्त अध्ययन पद्धती कार्यक्रम योजनेचे उद्देश काय आहे?शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी ,प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यत मुलांचा औपचारिक /आनौपचारिक शिक्षण प्रक्रियेत सहभाग होण्याच्या दृष्टीने किमान शैक्षणिक कौशल्ये /गुणवत्ता यांची प्रगतीसाठी ,बालकांना शिक्षण प्रक्रियेचा आनंद घेता यावा यासाठी कृतीयुक्ती अध्ययन पद्धती कार्यक्रम उपयुक्त आहे.
2 प्राथमिक शिक्षण योजनागणित व विज्ञान मित्र उपक्रम योजनेचे उद्देश काय आहे?सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळामध्ये सुरु असलेल्या इयत्ता १ली ते ८ वी च्या शाळामध्ये गणित व विज्ञान शिक्षकांची असलेली कमतरता भरून काढून विद्यार्थ्यांना गणितातील कठीण पाठ्यांशाच्या अध्यापनावर विशेष भर देणे तसेच विज्ञान विषयातील प्रयोगांचे प्रात्यक्षिकामार्फत संबोध स्पष्ट् करणे व प्रयोगातून पडताळा घेवून निष्कर्ष काढणे आणि गणित व विज्ञान विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे यासाठी या योजनेंतेर्गत प्रत्येक तालुक्यातील विज्ञान महाविद्यालयातील विध्यार्थी शाळावर जावून विध्यार्थ्यांना अध्यापना करतील .
पदांचा तपशील
पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
विस्‍तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२29229
विस्‍तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ (स्पर्धा परीक्षा)10010
विस्‍तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-३1578
केंद्र प्रमुख (स्पर्धा परीक्षा)1366571
प्राथमिक शिक्षक58795109770
मुख्याध्यापक32630323
नागरिकांची सनद
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 शिक्षक नेमणुका व राजीनामा / आंतरजिल्हा बदल्या/ शिक्षक आस्था. सूची मान्यता समायोजन/शिक्षक निश्चिती/बिंदू नामावली नोंदवही/नगरपालिका हस्तांतर कामकाज/अप्रशिक्षित शिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण कामकाज नियंत्रण व माहिती संकलन/प्राथमिक शिक्षकांची जेष्ठता यादी तयार करणे व निवडणुकीस परवानगी देणे/जिल्हास्तरीय दक्षता समितीबाबतचे कामकाज/पारपत्रबाबतचे वरिष्ठानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था-१ वेळोवेळी शासनाने केलेला कालावधीमा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
2 जिल्हातील जिल्हा परिषद व नगरपालिका शिक्षण मंडळाकडील शिक्षक भरती (जिल्हा निवड समिती कामकाज)/प्रकल्पग्रस्त/स्वातंत्र सैनिक प्रकरणे/सरळ सेवा भारती परिक्षा नियोजन/सेवा प्रमाणपत्र दाखले/शिक्षक सार्वत्रिक बदल्या/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था-२ शासन निर्णयानुसारमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
3 सर्व संवर्गाच्या उपशिक्षक, पात्र पदवीधर, केंद्रप्रमुख, व मुख्य विस्तार अधिकारी, सरळसेवा भरती/पदोन्नती नेमणुका/सर्व संवर्गाच्या सेवा जेष्ठता याद्या(डिरेक्टरी)/बिंदू नामावली नोंदवही/अनुकंपा प्रकरणे/रिक्त पदांची माहिती एकवट/विस्तार अधिकारी(शिक्षण) आस्थापना संबधी संपूर्ण कामकाज वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -३ शासन नियमानुसारमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
4 अनधिकृत गैरहजर शिक्षक व शिक्षणसेवक कारवाई/शिक्षकाविरुद्ध तक्रार चौकशी/अपील/ विभागीय खाते चौकशी/मु.का.अ.शाळा भेटी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी शाळा भेटी प्रकरणी शिस्तभंग कारवाई/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -४ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
5 वर्ग ३, ४ कर्मचारी यांची आस्थापना व मुख्यालयातील शि.वि.अ. दैनंदिन मंजुरी/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -५ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
6 बालवाड्यांना परवानगी/प्राथमिक शिक्षकांचे गोपनीय अहवाल/सेवेत मुदतवाढ/शिक्षकांचे स्वेच्छानिवृत्ती/रुग्णात सेवानिवृत्ती/राजनामा प्रकरणे/विद्यार्थी गळती/सर्व्हेक्षण/पटनोंदणी/आयुक्त तपासणी कामकाज/ वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -६ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
7 कार्यालयाकडील संगणकीय कामकाज, आस्था १,२ व ३ ला मदत करणे व कार्यालयातील दफ्तर तपासणी, सर्व पंचायत समितीकडील वार्षिक तपासणीचे कामकाज, वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -७ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
8 प्राथमिक शिक्षकांचे ज्यादा वयास क्षमापन/दिमट्रेड लागू करणे/वेतनसमानीकरण/वेतन संरक्षण प्रकरणे/पात्र पदवीधर/व.मु./कें.प्र. यांना डी एड वेतन श्रेणी देणे/वेतन त्रुटी व वेतन पडताळणी/मागील सेवा सलग धरणे बाबतची प्रकरणे/प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी नावात व जातीत बदल करणे/हिंदी व मराठी भाषा सुट देणे व वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -८ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
9 ५ सप्टेंबर आदर्श शिक्षक पुरस्कार योजना/पद्मभूषण वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार योजना/ बिल्लेछपाई/पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगावू वेतनवाढ देणे/राज्य राष्ट्रीय पुरस्कार/उपस्थिती भत्ता(वि.घ.यो.)/प्रोत्साहन भत्ता/उपस्थिती भत्ता(सर्वसाधारण) योजना/खाते प्रमुख/दिवाळी/घरबांधणी/प्रवास/ इतर तसलमात नोंदवही अद्यावत ठेवणे व त्याबाबतचे सर्व कामकाज/योजनांना तांत्रिक मंजुरी देणे/उपस्थिती भत्ता/केंद्रीय शाळांना दिले जाणारे अनुदानासंबंधी संनियत्रण करणे/ शाळांना विद्युत देयकेबाबतचे कामकाज/ सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना/ वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -९ डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
10 खाजगी प्राथमिक शाळा आस्थापना/नवीन शाळा प्रस्ताव मंजुरी/ तक्रारी/ शाळाप्रवेश/अनुषंगाने सर्व कामकाज/ पटपडताळणी/विनानुदानित खाजगी प्राथमिक शाळा मुल्यांकन/ निशुल्क बिले/नैसर्गिकवाढी वर्ग तुकड्या मंजुरी/विभागीय स्तर व राज्य खाजगी शाळा आढावा/खाजगी शाळा संबंधित कामकाज/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१० ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
11 शाळा भाडे प्रकरणे/ जि.प. नवीन शाळा मंजूर करणे/ नाहरकत प्रमाणपत्र/ जि.प. शाळा नैसर्गिक वाढीने तुकडी मान्यता व समायोजन कामकाज/ सेमी इंग्रजी मध्यम वर्ग सुरु करणेस देणे/ दाखले प्रतीस्वक्षरी करणे. प्राथमिक शिक्षक परीक्षेस बसनेस परवानगी/ संगणक परीक्षेतून सूट/ माहिती अधिकार व अपील नोंदवही अद्यावत करणे व अहवाल सदर करणे/ स्वच्छ विदयालय पुरस्कार/ सेवा हमी कायदा/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -११ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
12 नवीन शाळा खोल्या बांधकामे/ दुरुस्ती, ४ टक्के अनुदानातून कंपाउंड वॉल बांधकाम/ शाळेस शौचालय बांधणे/ प्राथमिक शाळेत पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे बाबतचे / धोकादायक इमारती उतरविणे/ जि. प. मालकीच्या जागा इतर खाजगी शैक्षणिक संस्थेस वर्ग करणे/ जि. प. शाळेतील अतिक्रमण काढणे/ प्रॉपर्टी रजिस्टर/ जिल्हा वार्षिक योजनामधून शाळा खोल्या बांधकाम/ संरक्षण भिंत बांधकाम / दुरुस्ती विषयक कामे/ जि. प. मालकीची वसतिगृहे/ १३ व वित्त आयोग / स्वच्छतागृह/ वान्म्ह्सूल अनुदान योजना/ जि.प. शाळा क्रीडांगण करणे योजना/ नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन/ पूर निधी/ बायोमेट्रिक हजेरी प्रणाली योजना/ शाळा दत्तक घेणेबाबतचे कामकाज वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१२ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
13 वर्ग १,२ यांची आस्थापना व/ रजा मंजुरी/ दैनंदिन मंजुरीबाबतचे कामकाज राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना/ शिक्षक कल्याण निधी व वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१३ ५ सप्टेंबर ३० दिवस- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
14 आय.एस.ओ. मानांकन/ अपंग एकात्मक योजना/ चटोपाध्याय वेतनश्रेणी व निवड श्रेणी देणे/ दीर्घ मुदतीच्या रजा/ प्रसूती रजा/ अपंग वाहनभत्ता व व्यवसायकर माफ करणे/ स्काऊट/गाईड योजना/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१४ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
15 संकीर्ण/ ग्रामअभियान/ शालेय आरोग्य तपासणी/ वर्ग गाळून परीक्षेस बसनेस परवानगी देणे/ कुटुंब कल्याण अहवाल प्राथमिक शाळा प्रतवारी/ शिक्षक बँक पतसंस्थेशी पत्रव्यवहार/ शैक्षणिक सहली परवानगी/ सैनिक कल्याण निधी/ अंधानिधी/ ध्वजनिधी/ अल्पबचत/ सदभावना दिवस/ बालविवाह प्रतिबंध/ ग्राहक संरक्षण/ भ्रष्टाचार निर्मुलन/ समस्या निवारण/ ग्रामीण वाचनालय/ वृक्षलागवड/ प्रभातफेरी गुणदिन/ शैक्षणिक कामकाज/ लोकशाही दिन कामकाज/ चित्रपट, सर्कस व अन्य स्पर्धा बाबत कामकाज/ शालेय परिसरात औषधी वनस्पती रोपवाटिका तयार करणे/ पर्यावरण विषयक कार्यक्रम (ग्रा. पं.)/ संमेलन व देणग्या देणे बाबतचे कामकाज, प्राथमिक शिक्षण विभागाकडील सर्व शिक्षा अभियानकडील प्रशिक्षण वगळून इतर सर्व प्रशिक्षणाचे नियोजन त्या अनुषंगिक सर्व कामे/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१५ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
16 सर्व शिक्षा अभियान योजनेकडील सर्व आस्थापना/ डी.सी. बिलाबातचे सर्व कामकाज/ एक वर्षावरील व तीन वर्षावरील देयकास मंजुरी देणे बाबतचे संपूर्ण कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१६ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
17 इ. १ ते ७ वी जि.प. कडील परीक्षा/ ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा/ परीक्षा समिती कामकाज/ परीक्षा फी जमा खर्च/ शाळेच्या सुट्ट्यांचे परिपत्रक/ वेळापत्रक/ पाढे पाठांतर/ इ. ४ थी ची जि.प. शिष्यवृत्ती योजना/ शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्हास्तरावर तरतूद करणेची योजना/ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कामकाज/ टीईटी परीक्षाबाबतचे कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१७ ३० दिवस किंवा शासनाने दिलेला विहित कालावधीमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
18 अर्थ समिती सभा/ स्थायी समिती सभा/ जि.प. सभा, खातेप्रमुख सभा, विभागीय व राज्यस्तरीय आढावा सभा/ जिल्हा संपर्क अधिकारी दौरा/ सर्व सभांचे रिपोर्ट संकलणी करणे/ सर्व सभेचे प्रोसिडिंग लिहिणे/ एमआयएम रिपोर्ट/ ग्रामशिक्षण समिती/ जिल्हा सल्लागार समिती/ शिक्षक संघटना सभेचे कामकाज/ मागास वर्गीय कमिटी माहिती एकत्रीकरण/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१८ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
19 प्राथमिक शिक्षकांना सेवेत कायम करणे/ फायदे देणे./ परिविक्षाधीन कालावधी मंजूर करणे/ सर्व शाळा भेटी अहवाल तयार करणे/ पत्रद्वारा डी.एड. चे सर्व कामकाज/ वार्षिक प्रशासन अहवाल/ पंचायत राज समितीकडील प्रश्नावली माहिती/ प्राथमिक, माध्य., उच्च माध्य शाळा तपासणी अहवालाचे कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -१९ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
20 शिक्षण समिती सभा, सर्व कामकाज/ आवक मेजकडील झिरो पेंडेन्सी रिपोर्ट तयार करणे/ मा. उपमु. का. अजि. प. सांगली यांचेकडे सदर करावयाचे कर्मचारी दप्तर तपासणी अहवाल बाबतचे कामकाज/ कंट्रोल रजिस्टरबाबतचे कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -२० दैनंदिनमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
21 प्राथमिक शिक्षण विभागाकडील दूरध्वनी सेवा विषयक संपूर्ण कामकाज तसेच महत्वाचे दूरध्वनी संदेश संबंधित अधिकारी यांना तातडीने देणे/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे. जावक बारनिशीचे सर्व कामकाज/पी.आर.ए. – पी. आर. बी. नोंदवही कामकाज/मंत्री खासदार-आमदार-शासकीय, अर्ध शासकीय/ आयुक्त, लोकायुक्त, फॅक्स, माहिती अधिकारी रजिस्टर अद्यावत ठेवणे/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे. आवक/शासकीय टपाल रजिस्टर आठवडा तेरीज/ कर्मचारी तक्रार निवारण दिन कामकाज/साप्रवि व मुकाअ यांचे संदर्भ बाबत कार्यवाही/आवक मेजकडील /मा. आयुक्त, मा. उपसंचालक, मा.मु.का.अ. तपासणी बाबतचे कामकाज /वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.आस्था -२१ दैनंदिनमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
22 हस्तांतरणीय शासकीय/जी.प.योजना/विभागाकडील अंदाजपत्रक/खर्चाच्या नोंद्वह्यांचा वित्त विभागाशी ताळमेळ/अनुदान निर्धारण शासनाकडील येणे देणे/योजनेत्तर आस्था. अनुदान देयके तयार करणे/ए.जी.त्रैमासिक ताळमेळ मुंबईकडील कामकाज/शालार्थ/वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-१ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
23 स्थानिक निधी लेखा परीक्षण/महालेखाकार तपासणी/पंचायत राज समिती/ मुख्य लेखा व वित्त अधिकारी तपासणी पत्रव्यवहार/ जिल्हास्तर व तालुकास्तर सर्व शक कमी करून घेणे/अभिलेख वर्गीकरण/ अभिलेख कक्ष वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-२ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
24 नगरपालिका शिक्षण वर्गणी/प्राथ. शिक्षक/अधिकारी/कर्मचारी वैद्यकीय बिले/नगरपालिका कर/क.ले.अ. व लेखा १ यांचे कामकाजास मदत करणे/ वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-३ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
25 शालेय पोषण आहाराचे संपूर्ण कामकाज/शालेय पोषण आहार वेअर हाऊस तांदूळ साठा उचल नियंत्रण कामकाज / वरिष्ठांनी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-४ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
26 शालेय विविध स्पर्धा योजना/ आदर्श शाळा पुरस्कार योजना/ शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा योजना (जिल्हास्तर व तालुकास्तर)/ स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार योजना/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे. स.शि.अ. अंतर्गत संगणक प्रयोगशाळा उपलब्ध असणाऱ्या शाळांना ई-लायब्ररी योजना/ स्कूल ऑन व्हील्स योजना(फिरती संगणक शाळा) (आमदार फंड)/ ई- लर्निंग संगणकीय प्रशिक्षण देणे योजना वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-५ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
27 अराजपत्रित वर्ग ३ व ४ अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व प्रवास भत्ते देयके तयार करणे व सदर करणे/ आपले सरकार पोर्टल तक्रारीबाबातचे कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे. यथार्थदर्शी प्रारूप आराखडालेखा-६ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
28 मोफत गणवेश व लेखन साहित्य योजना (वि.घ.यो.)/ अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत योजना (वि.घ.यो.)/ १०३ विकास गटातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजना (सर्वसाधारण)/स्टेशनरी/४ टक्के सादील/ टी.व्ही./ रेडीओ/ ऑडीओ व कॅसेट कामकाज योजना/ डेडस्टॉकचे संपूर्ण कामकाज/ ओबीपी खरेदी/ शाळा फर्निचर खरेदी/ पुस्तकपेढी/ ग्रंथालय, किशोरमासिक/ भांडार विभागाची चौकशी संबधीचे कामकाज व पत्रव्यवहार / दूरध्वनी क्र. २३७२७१७ चे बिल करणे रजिस्टर ठेवणे, इंटरनेट बाबतचे संपूर्ण कामकाज / वारणावती आश्रमशाळा पत्रव्यवहार/ कार्यालयीन सादील अनुदान खरेदी बाबतचे संपूर्ण कामकाज/ जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत ग्रंथालय- पुस्तके/ स.शि.अ. अंतर्गत संगणक प्रयोगशाळा उपलब्ध असणाऱ्या शाळांना ई-लायब्ररी योजनांची टिप्पणी तयार करणे वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-७ ३० दिवसमा. शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. सांगली
29 . राजपत्रित वर्ग १ ते २ अधिकारी यांचे वेतन व प्रवासभत्ते देयके, अंदाजपत्रके तयार करणे व सदर करणे, रोखपाल शासकीय अधिकारी कर्मचारी, रोकड नोंदवही अद्ययावत ठेवणे, जामीन कदबे, नोंदवह्या बँकेचे व्यवहार अद्ययावत ठेवणे/ जीप क्र. ७५७ चे लॉगबुक, इंधन दुरुस्ती इत्यादी/ परिचर गणवेश/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.लेखा-८ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
30 पेंशन योजना कामकाज वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणेलेखा-९ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
31 क.महांकाळ, आटपाडी, कडेगाव, विटा, पलूस पेंशन/ गटविमा/ फंड/ पेंशन अदालत/ पेंशनर कर्मचारीची सर्व त्या अनुषंगिक पेंशनर कर्मचारी/ सर्व कामकाज-पत्रव्यवहार/ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सर्व लाभांची माहिती देणे/ अंशदान पेंशन योजना कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.पेंशन-१ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
32 जत, मिरज पेंशन/ गटविमा/ फंड/ पेंशन अदालत/ पेंशनर कर्मचारीची सर्व त्या अनुषंगिक पेंशनर कर्मचारी/ सर्व कामकाज-पत्रव्यवहार/ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सर्व लाभांची माहिती देणे/ अंशदान पेंशन योजना कामकाज/ वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.पेंशन-२ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
33 वाळवा, तासगाव, शिराळा जत, मिरज पेंशन/ गटविमा/ फंड/ पेंशन अदालत/ पेंशनर कर्मचारीची सर्व त्या अनुषंगिक पेंशनर कर्मचारी/ सर्व कामकाज- पत्रव्यवहार पाहणे/ सर्व न्यायालयीन प्रकरणाबाबतचा पत्र व्यवहार/ नोंदी करणे/ प्रकरणांची अद्यावत नोंदवही करणे/ तसेच सदर प्रकरणे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी वरील अनु. १ व २ यांचेकडे सादर करणे/ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सर्व लाभांची माहिती देणे/ कोर्ट केस कामकाज वरिष्टानी सोपवलेली आयत्या वेळेची कामे करणे.पेंशन-३ ३० दिवसमा. मुख्य कार्यकारी अधिकारी
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :