अर्थ विभाग

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे 
1 वित्त विभाग--जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी सबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना सहाय्यक म्हणून वरिष्ठ लेखा अधिकारी (वर्ग1) व तीन लेखा अधिकारी (वर्ग2) असतात. त्याच्या सल्ल्याशिवाय कोणताही प्राधिकारी आर्थिक व्यवहारास मंजुरी देत नाही. वित्त विभागातर्गत होणार्या विविध शाखांमार्फत खालील प्रमाणे कामकाज केले जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 वित्त विभागआस्थापना शाखा0आस्थापना शाखेमार्फत वित्त विभागातील लेखा संवर्गातील कर्मचारी यांचे नेमणूका, पदोन्नत्या, बदल्या, वेतनवाढी, जेष्ठता यादया, सेवानिवृत्ती, गोपनिय अभिलेख, पुनर्विलोकन केले जाते.इ.) लेखा संवर्गातील कर्मचायांचे सर्व परिक्षाविषयक कामकाज, सेवानिवृत्तीवेतन, भ.नि.नि., गट विमा, अधिकारी/कर्मचारी यांचे वैद्यकिय प्रतीपुर्ती प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी सादर करणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
3 वित्त विभागअंदाजपत्रक शाखा0महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नियम 137 व 138 मधील तरतूदी नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वनिधीचे मुळ अंदाजपत्रक, तसेच सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येते. सदरच्या अंदाजपत्रकाची छाननी वित्त समितीमध्ये करण्यात येते. समितीने शिफारस केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेकडे सदरचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी सादर करण्यात येते. सर्वसाधारण सभेत मा.जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या व सुचनांचा समावेश करुन सुधारित अंदाजपञक व मुळ अंदाजपञक मंजूर केले जाते. जिल्हा परिषदेचे अंदाजपञक मंजूरी नंतर संबधित विभागाकडे मंजुर निधीचे वितरण करण्यात येते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
4 वित्त विभागरोख शाखा0रोख शाखेत देयके मंजुर झाल्यावर याचे अनुदान वितरीत केले जाते. मासिक जमा व खर्चाच्या नोदीचां बँकेशी ताळमेळ घेतला जातो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
5 वित्त विभागभांडार शाखा0जिल्हा परिषदे कडील सर्व विभाग व पंचायत समिती यांना आवश्यक असणारे स्टेशनरी, फॉर्म व नोंदवहयांची खरेदी भांडार शाखे मार्फत करून वितरीत केली जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
6 वित्त विभागकोषागार शाखा0शासन स्तरावरून जिल्हा परिषदेस प्राप्त होणारा निधी हा कोषागार कार्यालयातून आहरीत केला जातो. सदर निधी चे योजना निहाय, विभाग निहाय वितरण, उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे, महालेखाकार कार्यालयाशी ताळमेळ घेनेचे कामकाज पूर्ण केले जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
7 वित्त विभागसंकलन शाखा0जिल्हातील सर्व पंचायत समिती व मुख्यालयातील जमा व खर्चाचे लेखे एकञित करुन जिल्हा परिषदेचा मासिक लेखा तयार केला जातो. मासिक लेखे दरमहाच्या वित्त समितीच्या मंजूरी नंतर स्थायी समिती समोर अंतिम मान्यतेसाठी ठेवले जातात.सबंधीत विभागाकडून मासिक लेख्याशी ताळमेळ घेतला जातो. मासिक लेख्यांवरुन जिल्हा परिषदेचा वार्षीक लेखे तयार केला जातो. सदर वार्षिक लेख्याची छाननी वित्त समितीच्या सभेमध्ये केल्यानंतर सप्टेंबर पूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी सादर केले जातात.जिल्हा परिषद सभेच्या मंजूरी नंतर सदरचे लेखे 15 नोंव्हेबर पुर्वी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जातात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
8 वित्त विभागभविष्य निर्वाह निधी शाखा0जिल्हा परिषदेकडील शिक्षकेत्तर वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे वित्त विभागामार्फत ठेवले जातात. सदर लेखे आदयावत ठेवण्यासाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर केला जातो.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
9 वित्त विभागअंतर्गत लेखा परिक्षण शाखा0महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील संदर्भ क्र. एपीटी/ 1092/सीआर/76613 दि.7/10/1997 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील लेख्याच्या तपासणी साठी जिल्हा स्तरावर अंतर्गत लेखा परिक्षण पथके निर्माण करणेत आली आहेत. सदर पथकामार्फत पुर्ण झालेल्या आर्थिक वर्षाचे खाते प्रमुख व पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण करण्यात येते. स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती व महालेखापाल कार्यालयाकडील लेखा आक्षेपांची पुर्तता करणसाठी समन्वय व मार्गदर्शन केले जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 वित्त विभागवेतन पडताळणी शाखा0जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वेतन आयोगानुसार होणार्या सुधारित वेतन निश्चिती पडताळणी या विभागामार्फत केली जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
11 वित्त विभागनिवृत्त वेतन शाखा0महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) 1982 च्या नियमाचे अधिन राहून जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वर्ग 3 च्या बाबतीत वयास 58 वर्ष व वर्ग 4 च्या बाबतीत 60 वर्ष पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होणार्या तसेच इतर प्रकारे सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांच्या प्रकरणांची छाननी करुन सेवानिवृत्ती वेतन मंजूर केले जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 वित्त विभागसंपूर्ण जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मंजुर करणारे प्राधिकारी कोण आहेतसंपूर्ण जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मंजुर करणारे प्राधिकारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत.
2 वित्त विभागवित्तीय नियंत्रणासाठी काय उपाय योजना केली जाते.वित्तीय सचोटी व संनियंत्रणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती व सर्व उपविभाग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे अंतर्गत लेखापरीक्षण पथकाकडून लेखापरीक्षण करण्यात येते. उपमुख्य व लेखा वित्त अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली खालील प्रमाणे पथकाची रचना करण्यात आलेली आहे. लेखाधिकारी – पथक प्रमुख सहाय्यक लेखाधिकारी – १ वरिष्ठ लिपिक – २ कनिष्ठ लिपिक – १
3 वित्त विभागवित्त विभागाची कार्यपद्धती कोणत्या नियमानुसार चालते.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८, वं ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून प्राप्त झालेले शासन निर्णयानुसार कार्यपद्धती चालते.
4 वित्त विभागभविष्य निर्वाह निधी शाखे मार्फत कोणकोणती कार्य पार पाडली जातात.जिल्हा परिषदेकडील शिक्षक वं शिक्षकेतर सेवकांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे. कर्मचार्यांिच्या मागणीनुसार नियमास अनुसरून वैद्यकीय उपचार/ उच्च शिक्षण / लग्न आणि धार्मिक कार्य / घर दुरुस्ती / प्लॉट खरेदी किंवा बांधकाम, अथवा घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अग्रीम मंजुर करणे. अंतिम लेखे वर्ग करणे. मयत कर्मचाऱ्यांचे वारसास ठेव संलग्न विमा योजनेचे लाभ देणे.
पदांचा तपशील
पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
सहाय्यक लेखाधिकारी22148
कनिष्ठ लेखाधिकारी19190
वरिष्ठ सहाय्यक (लेखा)391524
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)35333
नागरिकांची सनद
माहिती उपलब्ध नाही
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :